उघड्यावर मांस विक्री करणार्‍यां विरोधात मनपाची मोहीम; ४ पथकांच्या माध्यमातून ११ ठिकाणी कारवाई

Foto

औरंगाबाद: उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या विरोधात मनपा प्रशासनाच्या वतीने आज रविवारी मोहीम हाती घेण्यात आली. प्रसंगी चार पथकांच्या माध्यमातून शहरातील तब्बल ११ ठिकाणी कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रभारी मुख्य  पशुसंवर्धन अधिकारी शेख शाहेद यांनी सांजवार्ताशी बोलताना सांगितले.

पावसाळा सुरू होताच शहरात डासांचे व माशांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे साथरोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या संख्येत देखील वाढ होत आहे. तर दुसरीकडे सर्रासपणे रस्त्यावर मास विक्री करताना अनेक विक्रेते शहरभर नजरेस पडतात. शहरात ११५ मटन, ३२५ जनावरे, ८९ चिकन तर १५ मासे विक्रेते परवानाधारक आहेत. पण प्रत्यक्षात ही संख्या अधिक असल्याचे दिसून येते.अशी उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात मनपा प्रशासनाने आज रविवारी कारवाईची मोहीम हाती घेतली असून, बारा वाजेच्या सुमारास या कारवाईला प्रारंभ करण्यात आला. यावेळी चार पथक कारवाई करिता तैनात करण्यात आलेली आहेत. यासह नागरी पथकातील २ कर्मचारी व संबंधित पोलिस ठाण्यातील २ कर्मचारी या पथकाच्या मदतीला असतील. एकूण ११ ठिकाणी कारवाई करण्यात येणार आहे.  यात पडेगाव- मिटमिटा, पैठण रोड -कांचन वाडी, सातारा देवळाई, बीड बायपास रोड, हर्सूल जेल ते जळगाव रोड, हर्सूल पोलीस ठाणे परिसर, मुकुंदवाडी, प्रकाश नगर व सेंट्रल नाका आदी ठिकाणांचा समावेश आहे. यावेळी पशुधन पर्यवेक्षक ए.जे. जाधव, भारत बिरारे, एस. एम. नंदन, रावसाहेब जावळे आदींची उपस्थिती होती.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker